Wednesday, 31 August 2022

ऑन लाईन ऊस नोंदणी

 

अशी करा मोबाईलवर ऊस नोंदणी



सर्व प्रथम गुगल प्ले स्टोअर मधून 

महाऊस नोंदणी ( Maha Us Nondani )

नावाचे अँप्लिकेशन डाउनलोड करावे 


अँप डाउनलोड होताच ऊस क्षेत्राची माहिती भरा हे बटन दाबावे.


पुढे ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती असा भाग दिसेल .

त्यामध्ये मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, पूर्ण नाव टाकावे . पुढे बटन दाबावे .


त्यानंतर ऊस लागवडीची माहिती असा भाग दिसु लागेल.

तेथे लागवडीचा प्रकार , उसाची जात,लागवड तारीख नमूद करावी . ऊस क्षेत्र गुंठ्यांत भरावे .त्यांनतर पुढे असे बटन दाबावे . 

ऊस पीक उपलब्ध माहिती कोणत्या कारखान्याला कळवू इच्छिता असे दिसून येईल . 

त्यामध्ये कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीन कारखान्याची नावे टाकता येतील .

ती टाकून पुढे हे बटन दाबावे .


आपणास धन्यवाद असा संदेश दिसू लागेल .

त्यांनंतर निवडलेले कारखाने सम्पर्क करतील .


यानंतर साखर कारखान्यातील आपली ऊस नोंदणी पहा वर क्लिक करा  . नोंदणी केलेला  मोबाईल क्रमांक टाका . पुढे हे बटन दाबा . 

ही नोंदणी होताच  ऍप मध्ये केलेली नोंद , कारखान्याने स्वीकारलेली नोंद , आणि  कारखान्याने नाकारलेली नोंद 

ही माहिती पाहू शकतो 

ऍप डाउनलोड लिंक  खाली दिलेली आहे . 


Maha Us Nondani ऍप डाउनलोड करण्यासाठी येथे दाबा

               येथे दाबा.


धन्यवाद.


No comments:

Post a Comment