Friday, 6 October 2017

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2018


जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 10 फेब्रुवारी 2018 रोजी होणार
प्रवेश अर्ज पहिल्यांदाच ऑनलाईन भरले जाणार


पालघर येथील जवाहर नवोदय विद्यालयमध्ये इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशासाठीच निवड चाचणी परिक्षा दिनांक 10 फेब्रुवारी 2018 रोजी घेतली जाणार आहे त्यासाठीचे प्रवेश अर्ज या वर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन पध्दतीने भरले जाणार आहेत. य परिक्षेस बसण्यास इच्छुक पाचवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावरून  (www.nvshq.org) प्रमाणपत्र प्राप्त  करुन घ्यावे व संबधित शाळेतील मुख्याध्यापकाकडुन  सांक्षाकित करुन आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ केंद्रावर जाऊन अपलोड करावे.
            प्रवेश अर्ज पत्र भरण्याची शेवटची मुदत दिनांक 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत असुन त्यासाठी रु.35/- शुल्क आकारले जाईल. सदर प्रमाणपत्रासोबतच विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे  छायचित्र व स्वाक्षरी स्कॅन करुन अपलोड करावी लागणार आहे.
            प्रवेश अर्ज भरते वेळी काहीही समस्या उदभवल्यास बी. एम चौधरी परीक्षा प्रमुख यांचेशी दुरध्वनी क्र. 02525-241166  व भ्रमणध्वनी क्र. 9850027066 वर संपर्क साधावा.
            सदर परीक्षेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे जिल्हाधिकारी पालघर तथा अध्यक्ष जवाहर नवोदय विद्यालय व्यवस्थापन समिती पालघर यांनी केले आहे.

                          CLICK HERE

अधिक माहितीसाठी वरील लिंक ला भेट द्या.


No comments:

Post a Comment