Monday, 18 September 2017

जिल्हा अंतर्गत बदली संवर्ग 3

मा. राज्य मार्गदर्शक भोसले सर यांच्या दि 19/09/2017 च्या पोस्टनुसार जिल्हाअंतर्गत बदली मधील संवर्ग-३ मधील शिक्षकांना

(अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षक) आपला बदली साठीचा फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या हेतूने मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.सदर मॅन्युअल बारकाईने वाचून त्याप्रमाणे कृपया फॉर्म भरावे,ही विनंती.

                   CLICK HERE
➡ आजपासून नंदुरबार, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यासह उर्वरित सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांना संवर्ग-३ साठीचा फॉर्म
दिनांक २१/०९/२०१७ पर्यंत उपलब्ध करून दिला जाणार आहे याची नोंद घ्यावी.

✏ विशेष शिक्षक संवर्ग-३  भाग मध्ये कोणते कर्मचारी येतात?
➡ जे कर्मचारी सध्या अवघड क्षेत्रात कार्यरत आहेत व ज्यांची अवघड क्षेत्रात एकूण सलग सेवा ३ वर्षे वा त्यापेक्षा अधिक झालेली आहे असे कर्मचारी संवर्ग-३ मध्ये येतात.

 ➡ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादी मध्ये ज्या शिक्षकांची नावे आहेत असे सर्व शिक्षक संवर्ग-३ मध्ये form भरू शकतील.परंतु या सर्व शिक्षकांना form भरावे असे कोणतेही बंधन नाही आहे याची नोंद घ्यावी.अशा शिक्षकांना जर बदली हवी असेल तरच फॉर्म भरावे. संवर्ग-३ मध्ये form भरावयाचा नाही आहे म्हणजेच अवघड क्षेत्रातून बदली करावयाची इच्छा नाही अशा शिक्षकांनी form भरू नये.आपण form भरला नाही तर त्याचा अर्थ समजला जाईल की आपणास बदलीची इच्छा नाही आहे.

➡  परंतु एक बाब ही देखील लक्षात घ्यावी की अवघड क्षेत्रातील १० वर्षापेक्षा अधिक सलग सेवा असलेले शिक्षक हे बदली अधिकार प्राप्त तर असतातच परंतु ते बदलीपात्र म्हणजेच TUC देखील आहेत.असे शिक्षक देखील संवर्ग-३ मध्ये form भरू शकतात तसेच हे बदलीपात्र देखील असल्याने या शिक्षकांच्या जागा संवर्ग-१,२ व ३ मधील शिक्षक घेऊ शकतात याचाच अर्थ असा की या शिक्षकांना वरील १ ते ३ संवर्गातील शिक्षक खो देऊ शकतात.

No comments:

Post a Comment